विमानाला हवाई हद्द वापरु देण्यास पाकिस्तानकडून नकार   

नवी दिल्ली : दिल्ली ते श्रीनगर प्रवास करणार्‍या इंडिगो कंपनीच्या एका विमानाला पाकिस्तानने हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई केल्याची बाब उघड झाली आहे.प्रवासादरम्यान विमान हवेच्या झोतात अडकू नये, यासाठी बुधवारी त्यालां पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करु देण्याची विनंती वैमानिकाने केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली. प्रवासादरम्यान, विमानाच्या पुढच्या टोकाला भगदाड पडले होते. त्यामुळे विमान वार्‍याच्या झोतात अडकण्याची भीती निर्माण झाली होती. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करु देण्याची विनंती केली होती. मात्र ती नाकारण्यात आली. मेघगर्जना सुरू असताना विमानाच्या पुढच्या टोकाला भगदाड पडले होते. विमानाने बरेच अंतर कापले होते. त्यामुळे ते माघारी घेता येणे अशक्य होते. त्यामुळे श्रीुनगर गाठण्यासाठी जवळचा हवाई मार्ग म्हणून पाकिस्ताच्या हवाई हद्दीत प्रवेश करणे आणि परतणे हा होता. स्वयंचलित यंत्रणा बंद पडली होती. वेगातही फरक पडला होता. विमान ८ हजार ५०० फूट प्रति मिनिट खाली येत होते. त्यामुळे आणीबाीची परिस्थिती होती. अखेर तशा परिस्थितीत श्रीनगर विमानतळावर उतरले. दोनशेहून अधिक जण प्रवास करत होते. कोणीही जखमी नसल्याची माहिती देण्यात आली  पाहणी केली तेव्हा विमानाच्या पुढच्या टोकाला भगदाड पडल्याचे दिसून आले. 
 

Related Articles